मुंबई

देवळी गावात ऑईस्टर मशरूम शेतीचा नवा आदर्श

CD

देवळी गावात ऑईस्टर मशरूम शेतीचा नवा आदर्श
किरण भोजने यांचा अभिनव उपक्रम
माणगाव, ता. ३१ (वार्ताहर) : माणगाव तालुक्यातील देवळी गावातील भाजीपाला विक्रेते किरण भोजने यांनी आपल्या घरीच ऑईस्टर मशरूमची आधुनिक शेती सुरू करून एक आदर्श निर्माण केला आहे. ‘माऊली मशरूम फार्म’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावात शेतीतील नव्या संधींचे दालन खुले झाले आहे.
किरण भोजने यांनी कमी जागेत, कमी खर्चात आणि वैज्ञानिक पद्धतीने मशरूम उत्पादन करून चांगले उत्पन्न मिळवण्याचा मार्ग निवडला आहे. त्यांच्या या उपक्रमाची माहिती मिळताच देवळी ग्रामपंचायतचे सरपंच विनेश यशवंत डवळे, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी माऊली मशरूम फार्मला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी मशरूम शेतीची पाहणी करून किरण भोजने यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी अशा प्रकारचे पूरक व्यवसाय ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, रोजगारनिर्मितीसाठीही उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. शेतीसोबत जोडधंदा म्हणून मशरूम शेतीकडे पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. देवळी गावात सुरू झालेला हा ‘माऊली मशरूम फार्म’ भविष्यात इतर शेतकरी व युवकांसाठी प्रेरणास्थान ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

Online Trending Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली बारामतीतील व्यावसायिकाची सव्वा कोटींची लूट

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

SCROLL FOR NEXT