मुंबई

प्रणव प्रशांत राणे सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शिष्यवृत्तीस पात्र

CD

रयत प्रज्ञाशोध परीक्षेत गव्हाणच्या विद्यालयाचे यश
प्रणव राणे शिष्यवृत्तीचा मानकरी
नवी मुंबई, ता. ३१ ः रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर प्रबोधिनीमार्फत घेतलेल्या रयत प्रज्ञाशोध परीक्षेत गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी प्रणव राणे याने घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत प्रणव याने १३२ गुण मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर प्रबोधिनी अंतर्गत संस्थेच्या सर्व शाखांमधील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यशवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थी घडविण्यासाठी रयत प्रज्ञाशोध परीक्षा ही सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये विद्यालयातील २९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, प्रणव राणे हा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरला आहे. प्रणवला आठवी व नववी अशा सलग दोन वर्षात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. इतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये सात्विक भोईर, अमन दुबे, आदित्य कनौजिया, अंश मोकल, करण सूर्यवंशी, स्वराग ठाकूर, शिवानी गोदलवाड, हिमानी कोळी, आरोही खरात, जिविका कोळी, आरोही नाळे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयातील सर्व शिक्षक आणि विशेष मार्गदर्शक तसेच या विभागाच्या प्रमुख प्रतिज्ञा घरत आदींचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे. विशेषकरून विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण भगत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता ठाकूर व विश्वनाथ कोळी ज्युनियर कॉलेज विभाग स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, ॲड. राहुल घरत व विजय घरत, विद्यालयाच्या प्राचार्या ज्योत्स्ना ठाकूर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विलासराव लेंभे, पर्यवेक्षिका शशिकला पाटील, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर रवींद्र भोईर, लाइफ वर्कर देवेंद्र म्हात्रे, ज्युनियर कॉलेज विभागाचे प्रमुख संजय उगले, ज्येष्ठ शिक्षक सागर रंधवे आदींनीही या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Blockade: अमेरिकेची नाकेबंदी निष्फळ? समुद्री मार्ग बंद, तरी इराणचा नवा डाव; रेल्वेने चीन आणि पाकिस्तानला तेल पुरवठा

३० फेब्रुवारीला जन्म, कागदपत्र पाहून मुस्लीम महिलेची याचिका फेटाळली; भारतीय मानण्यास हायकोर्टानं दिला नकार

सीएनजीच्या दरवाढीनंतरही पंपांवर सीएनजी भरण्यासाठी वाहनांची गर्दी

Religious Tourism Bus Service : शिवशाही, आरामदायीमधून पर्यटकांसाठी विशेष बस सेवा, सहलींमध्ये निवास व भोजन व्यवस्था

Gadchiroli: दिल्ली येथे शैक्षणिक सहलीसाठी नागपूर विमानतळावरून प्रस्थान करताना विद्यार्थी.गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे विमानाने 'दिल्ली उड्डाण'; संसद भवन आणि राष्ट्रपती भवनाला देणार भेट !

SCROLL FOR NEXT