मुंबई

सुरुंग स्फोटांमुळे घराला तडे

CD

शहापूर, ता. ३१ (वार्ताहर) : तालुक्यातील मोखावणे गावाच्या हद्दीतील कातकरीवाडीलगत खासगी जमिनीच्या विकासासाठी करण्यात आलेल्या सुरुंग स्फोटांमुळे एका आदिवासी दिव्यांगाचे घर मोडकळीस आल्याचा प्रकार समोर आला आहे. डाव्या हाताने अपंग असलेले गोरख झिपा मुकणे यांच्या राहत्या घराला तडे जाऊन ते धोकादायक स्थितीत पोहोचले आहे. घरदुरुस्ती अथवा नव्याने बांधून देण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
मोखावणे येथील कातकरीवाडी परिसरात काही दिवसांपासून उत्खननासाठी सुरुंग स्फोट केले जात आहेत. या स्फोटांच्या तीव्र धक्क्यांमुळे मुकणे यांच्या घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. घराची रचना कमकुवत झाली आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या मुकणे यांना सरकारच्या आवास योजनेतून मिळालेले हे घर मोठ्या प्रतीक्षेनंतर उभे राहिले होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तेच घर राहण्यासाठी असुरक्षित बनले आहे. याच परिसरातील इतर घरांनाही अशाच प्रकारे तडे गेल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
याप्रकरणी मुकणे यांनी शहापूर तहसीलदारांकडे निवेदन सादर करून सुरुंग स्फोट तत्काळ थांबवावेत, नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करावा, संबंधितांकडून दुरुस्ती अथवा नवीन घर बांधून द्यावे आणि जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या बुधवारी (ता. १) तहसील कार्यालयाबाहेर उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

तहसीलदारांकडून दखल
दरम्यान, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी उत्खनन करणाऱ्या जमिनीचे मालक रुस्तुमजी बाटलीवाला यांना पत्र पाठवून तत्काळ दखल घेण्याचे निर्देश दिले आहे. अन्यथा, कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच कसारा येथील मंडळ अधिकारी व तलाठी यांना या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

माझ्या घरालगतच्या जमिनीत सुरुंग स्फोट केल्यामुळे भिंतींना तडे गेले आहेत. घराचा पाया ढासळण्याची भीती असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. माझ्या घराचा प्रश्न निकाली न निघाल्यास तहसील कार्यालयाबाहेर उपोषणास बसणार आहे.
- गोरख मुकणे, पीडित

शहापूर : मोखावणे येथील कातकरीवाडीत सुरुंग स्फोटांमुळे घराला तडे गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

Online Trending Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली बारामतीतील व्यावसायिकाची सव्वा कोटींची लूट

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

SCROLL FOR NEXT