बीकेसीतील स्वच्छतेसाठी यांत्रिक झाडू
वर्षाला सुमारे अडीच कोटींचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः वांद्रे कुर्ला संकुलातील रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडूद्वारे केली जाते. २१.६० किलोमीटर लांब रस्त्याच्या सफाईसाठी पालिका वर्षाला अडीच कोटी रुपये, तर तीन वर्षांसाठी सात कोटी २२ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
बीकेसी परिसर एमएमआरडीच्या ताब्यात असून, संबंधित प्राधिकरणाने रस्त्याची सफाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावरुन जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल व्यापारी केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. बीकेसीत कार्पोरेट कंपन्या असून, चार लाख लोक बीकेसीतील विविध कार्यालयात कार्यरत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांची कार्यालये या परिसरात असल्यामुळे बऱ्याच परदेशी नागरिकांचा वावरही या संकुलात असतो. या सर्व वैशिष्ट्यांमुळे या संकुलाची तुलना जगभरातील तश्याच प्रकारच्या व्यापारी केद्रांशी केले केली जाते. याचसाठी या परिसरात आधुनिक आणि पर्यावरणपूरक सुविधा जसे मेट्रो, इलेक्ट्रिक बस यांचे जाळे निर्माण केले जात असल्याने साफसफाईसाठी विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे २०१४ पासून रस्त्यांची यांत्रिकी झाडू संयंत्राने साफसफाई केली जाते. यापूर्वी असलेले कंत्राट फेब्रुवारी २०२६ रोजी संपुष्टात आला असून, आता पुढील तीन वर्षांकरिता या यांत्रिक सफाईच्या कामांसाठी लक्ष्य एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.