एआय-आधारित कॅन्सर तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य जनजागृतीस नवी दिशा; ममताताई प्रितम म्हात्रे यांचे आवाहन
पनवेल, ता. ३१ (बातमीदार) : पनवेल महानगरपालिका हद्दीत आयोजित मोफत सामान्य आरोग्य व स्तन कर्करोग तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे आरोग्य जनजागृतीला नवी चालना मिळत आहे. ‘आज केलेली एक छोटी तपासणी, उद्याचे आयुष्य सुरक्षित करेल’ या संदेशातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या सर्व १५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे शिबिर सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पुढील तीन महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. या शिबिरात एआय-आधारित स्तन कर्करोग तपासणीसोबतच रक्तदाब (बीपी), रक्तातील साखर (शुगर) आणि इतर आवश्यक आरोग्य तपासण्या केल्या जात आहेत.
या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममताताई प्रितम म्हात्रे यांनी शिबिराला भेट दिली. त्यांनी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व लाभार्थी नागरिकांशी संवाद साधून सुविधांची माहिती घेतली. महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
महिला व बालकल्याण समितीमार्फत भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.