मुंबई

केडीएमसीतील वरिष्ठ लिपीकावर महिला कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप

CD

वरिष्ठ लिपिकावर ब्लॅकमेलचा आरोप

केडीएमसीतील प्रकार; मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील एका वरिष्ठ लिपिकाने महिला कर्मचाऱ्याला कामावरून काढण्याची धमकी देत शारीरिक संबंधांची मागणी केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित महिला कर्मचाऱ्याने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, भूषण पाटील (वरिष्ठ लिपिक) यांनी काही दिवसांपूर्वी सावळाराम क्रीडा संकुलात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याशी वाद घातला होता. कामाच्या कारणावरून झालेल्या या वादावेळी त्यांनी संबंधित महिलेला अपमानास्पद शब्दांत सुनावल्याचेही सांगण्यात आले. सहकाऱ्यांनी मध्यस्थी करीत हा वाद तात्पुरता मिटवला होता.
यानंतर काही दिवसांनी आरोपीने संबंधित महिलेला व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे संपर्क साधला. ‘वरिष्ठांकडून तुला कामावरून काढण्याचे आदेश आहेत; मात्र मी ते थांबवू शकतो, असे सांगत त्याने तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने तिने अखेर मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी भूषण पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी या घटनेची पुष्टी करीत तपास सुरू असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणात आणखी काही महिला कर्मचाऱ्यांनीही अशाच प्रकारचे आरोप केल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावर सुरू असून, अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT