मुंबई

आर्थिक वर्षअखेर करभरणा केंद्रांवर शांतता

CD

आर्थिक वर्षाअखेर करभरणा केंद्रांवर शांतता
- दस्त नोंदणीसाठी अपेक्षित गर्दी नाही
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाणे पालिकेच्या माध्यमातून मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीवर भर देण्यात येत आहे. अशातच मालमत्ता कारावरील व्याजदारात ९० टक्के सवलत देण्यात आली असून, मंगळवारी (ता. ३१) त्याचा अंतिम दिवस असल्याने करभरणा केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पालिकेच्या कोणत्याही कर भरणा केंद्रावर अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. तशीच काहीशी परिस्थिती दस्त नोंदणीबाबतही पाहण्यास मिळाली. तिथेही अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. नेहमीप्रमाणे शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिक कार्यालयांकडे धाव घेतात, मात्र यंदा हे चित्र काहीसे बदलले असल्याचे दिसून आले.
आर्थिक वर्ष बदलल्यानंतर नोंदणी व रेडीरेकनर दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असते. त्यामुळे अनेकदा आर्थिक वर्षाच्या अखेरीस दस्त नोंदणीसाठी मोठी गर्दी होताना दिसून येते. मात्र यंदाच्या वर्षी रेडीरेकनर दरात वाढ होण्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत आदेश दुय्यम निबंधक कार्यालयांना प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे शेवटच्या दिवशी दस्त नोंदणीसाठी मोठी गर्दी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. तथापि, चरई आणि जांभळी नाका येथील निबंधक कार्यालयांमध्ये नियमित प्रमाणातच व्यवहार पार पडले. दररोजप्रमाणेच सुमारे ६० ते ७० नोंदणी व्यवहार पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीवरही याचा परिणाम जाणवला. महापालिकेने थकबाकीवरील दंडमाफी जाहीर केल्यानंतर नागरिकांनी १२ ते २५ मार्चदरम्यान मोठ्या प्रमाणावर करभरणी केली. त्यामुळे ३१ मार्चला प्रभाग समित्यांमधील करभरणा केंद्रांवर केवळ तुरळक गर्दी दिसून आली. यंदा आर्थिक वर्षाच्या अखेरीस शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळून नागरिकांनी पूर्वनियोजनाला प्राधान्य दिल्याचे चित्र ठाण्यात दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT