लाचप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
पोलिस निरीक्षकाची महिला पोलिस कर्मचाऱ्याकडे मागणी
भाईंदर, ता. ३१ (बातमीदार) : वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांच्याच महिला पोलिस कर्मचाऱ्याकडे लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काशी मिरा पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
कमल चव्हाण या काशी मिरा वाहतूक विभागात कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात केलेल्या तक्रारीनुसार वाहतूक शाखेचे निरीक्षक सागर इंगोले यांनी त्यांच्याकडे दरमहा १५ हजार रुपयांची मागणी केली होती. सहाय्यक उपनिरीक्षक गोलारेदेखील ही रक्कम द्यावीच लागेल, असे त्यांना सातत्याने सांगत असत. मात्र एवढी रक्कम देणे अपल्याला शक्य नसल्याचे चव्हाण यांनी सांगितल्यानंतरही त्यांचा पैशासाठी तगादा सुरूच होता.
अखेर याप्रकरणी चव्हाण यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तक्रार दाखल केली. या विभागाने इंगोले व गोलारे पैसे मागत असल्याची दोन वेळा पडताळणी केली. त्यात दोघेही पैशाची मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, चव्हाण यांनी यासंदर्भात वरिष्ठांकडेदेखील तक्रार केली. त्यामुळे दोघेही आता पैसे स्वीकारणार नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या लक्षात आले. मात्र दोघांनीही लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने इंगोले व गोलारे या दोघांविरोधात या विभागाने सोमवारी (ता. ३०) रात्री काशी मिरा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.