मुंबई

पालिकेच्या क्रीडा भवनाचा १०० वर्षांचा इतिहास पुसण्यास विरोध

CD

क्रीडा भवनासाठी कामगार एकत्र
पालिकेच्या क्रीडा भवनाचा १०० वर्षांचा इतिहास पुसण्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर पालिकेच्या क्रीडा भवनाच्या जागी टाऊन हॉल उभारण्याचा घाट घातला जात आहे. क्रीडा भवनाचा १०० वर्षांचा इतिहास पुसला जाणार असून, त्याला पालिकेतील क्रीडा भवनातील सेवानिवृत्त कामगारारांनी तीव्र विरोध केला आहे. आता क्रीडा भवन वाचविण्यासाठी कामगार एकत्र येत आहेत. क्रीडा भवन वाचविण्याचे साकडे त्यांनी प्रशासनाला घातले आहे.

पालिकेचे क्रीडा भवन शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी सभासद, खेळाडू, आजीव सभासद, नगरसेवक यांची संयुक्त बैठक सोमवारी (ता. ३०) पालिका मुख्यालयासमोरील मुख्य क्रीडा भवन, बॅडमिंटन कोर्ट येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी क्रीडा भवनाच्या जागी टाऊन हॉल उभारण्याचा पालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करण्यात आला. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी पालिकेने १९२६ मध्ये क्रीडा भवनाची स्थापना केली होती. या क्रीडा भवनातून अनेक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली. त्यामुळे सध्याचे क्रीडा भवन कोणत्याही परिस्थितीत गमवायचे नाही, असा ठराव बैठकीत घेण्यात आला. क्रीडा भवनचे १२ हजार सदस्य असून, अडीच हजारांपेक्षा जास्त आजीव सदस्य आहेत. यात नगरसेवकांचाही समावेश आहे. त्यामुळे सध्याची क्रीडा भवनाची इमारत वाचवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या विरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.
--------
एक इंचही जागा न सोडण्याचा ठराव
क्रीडा भवनाच्या जागी टाऊन हॉल बांधा अथवा महापालिका सभागृह, पण विविध क्रीडा प्रकारासाठी आरक्षित असलेल्या सध्याच्या जागेपैकी एक इंचही जागा सोडणार नाही. नवीन इमारत बांधल्यानंतर क्रीडा भवनासाठी जागा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात यावी, असा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचं हेच महागाई नियंत्रणाचं सूत्र, शरद पवारांचा गॅस दरवाढीवरून टोला; शेवटी इशाराही दिला

26/11 वेळी 20 गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी ती परिचारिका कोण ? कंगनाने साकारलीय भूमिका

Photos : 1000 वर्षे जुनी प्राचीन शिलालेखांची कलाकृती सापडली; काळाच्या ओघात दडलेला 7व्या- 8व्या शतकाचा इतिहास, फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

Mumbai: मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मित्र-मैत्रिणींसोबत मद्यपान केले अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT