मुंबई

वृद्ध महिलेची लुट

CD

बस प्रवासात वृद्ध महिलेची लूट
महामार्गावरील धानिवरीत प्रकार; चौघांना अटक
कासा, ता. ३१ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बसने प्रवास करणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेची सहप्रवाशांकडूनच लूट झाल्याची घटना पालघर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. डहाणू तालुक्यातील धानिवरी येथील तुलसी हॉटेलवर बस थांबल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाैघांना अटक करण्यात आली आहे, तर दोन आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील बहाडोली येथून महाडकडे जाणाऱ्या गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये संबंधित वृद्ध महिला प्रवास करत होती. प्रवासादरम्यान सहा सहप्रवाशांनी तिच्या बॅगेवर लक्ष ठेवून संधी साधत सोने व चांदीचे दागिने चोरले. बस धानिवरी येथील एका हॉटेलवर जेवणासाठी थांबल्यानंतर महिलेला बॅगेतील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर तिने तत्काळ कासा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांची कसून तपासणी केली असता सहा सहप्रवाशांनीच चोरी केल्याचे उघड झाले. सोमवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चाैघांना अटक केली असून, दोघे घटनास्थळावरून पसार झाले आहेत. तसेच महिलेचे चोरीस गेलेले सर्व सोने व चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई कासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक किशोर पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, पोलिस हवालदार मनोहर जाधव व शिपाई गांगुर्डे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT