मुंबई

कोपरखैरणेत पाणी वितरणाच्या धंद्याआड अमली पदार्थाची तस्करी

CD

अमली पदार्थप्रकरणी दोघांना अटक
टास्क फोर्सची कोपरखैरणेत धडक कारवाई
नवी मुंबई, ता. ३१ (वार्ताहर) : कोकण कृती विभागाच्या अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कोपरखैरणे परिसरात कारवाई करत एमडी या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. मोहम्मद फैज अली खान (२४) आणि अल्ताफ मुन्ना शेख (२५) अशी त्यांची नावे असून, टास्क फोर्सने त्यांच्याजवळ असलेला ११ लाख ६० हजार रुपये किमतीची एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थांची भुकटी जप्त केली आहे. विशेष म्हणजे यातील एक तरुण पाणी वितरण करण्याच्या धंद्याआड अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे तपासात आढळले आहे.

कोकण कृती विभागाचे अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समधील सहाय्यक पोलिस निरीक्षक उदयसिंग काळे व त्यांचे पथक २९ मार्चला पहाटे कोपरखैरणे परिसरात गस्त घालत असताना सेक्टर-९ येथून रेल्वे स्थानककडे जाणाऱ्या मार्गावर मोहम्मद फैज अली खान आणि अल्ताफ मुन्ना शेख हे दोघे संशयास्पदरीत्या हालचाली करताना आढळले. टास्क फोर्सच्या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ ५८ ग्रॅम वजनाची एमडी पावडर आढळली.
त्यामुळे टास्क फोर्सच्या पथकाने या दोघांविरोधात कोपरखैरणे पोलिस ठाण्यात एनडीपीएसनुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याजवळ सापडलेले ११ लाख ६० हजार रुपये किंमतीची एमडी पावडर, दोन मोबाईल फोन असा १२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना २ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील मोहम्मद फैज हा कोपरखैरणे भागात स्वच्छ पाण्याचे कॅन वितरण करण्याचे काम करत होता. या व्यवसायाच्या आडून तो अमली पदार्थाची विक्री करत असल्याचे तपासात आढळले आहे.

दोघांवर यापूर्वी खुनाचे गुन्हे दाखल
या कारवाईत अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी मित्र असून, दोघेही वेगवेगळ्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. या हत्या प्रकरणात दोघेही जेलमध्ये असताना, त्यांची चांगली मैत्री झाली होती. मोहम्मद फैज हा अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अल्ताफ मुन्ना याला होती. अल्ताफकडे अमली पदार्थाची कुणी मागणी केल्यास तो मोहम्मद फैज याच्याकडून अमली पदार्थ घेऊन तो विक्री करत असल्याचे तपासात आढळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT