मुंबई

वसईत विकृतीचा कळस; वडिला सोबतच्या जुन्या वादातून चक्क चार वर्षाच्या मुलाला पायाला धरून फिरवून आपटून मारले

CD

चार वर्षांच्या मुलाला फिरवून आपटले
वसईत विकृतीचा कळस; जुन्या वादातून कृत्य; आरोपीला अटक
नालासोपारा, ता. ३१ (बातमीदार)ः वसईत विकृतीचा कळस पाहायला मिळाला. एका चार वर्षांच्या मुलाच्या पायाला पकडून गरगर फिरवून आपटून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या विकृतीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याप्रकरणी वसई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एका चार वर्षांच्या मुलाला एवढ्या विकृतीने मारणाऱ्या आरोपीविरोधात फास्ट ट्रॅकवर केस घेऊन एक महिन्यात निकाल लावावा, अशी मागणी महापौर अजीव पाटील यांच्यासह बालकाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
वसई पश्चिम कोर्टाजवळील अनुपम घरसंकुल या सोसायटीत सोमवारी (ता. ३०) रात्री ही घटना घडली. संदीप पवार असे विकृत रिक्षाचालकाचे नाव आहे. तो याच सोसायटीच्या बी विंगमधील रहिवासी आहे. तर विघ्नेश कोंडारे असे जखमी साडेतीन वर्षांच्या बालकाचे नाव आहे. आरोपी आणि बालकाचे वडील यांच्यात दोन वर्षांपूर्वी आर्थिक कारणावरून वाद झाला होता. याच वादाचा राग या आरोपीच्या मनात होता. सोमवारी रात्री आरोपीने सोसायटीच्या आवारात आपली रिक्षा लावली होती. त्या ठिकाणी सोसायटीमधील सर्व मुले खेळत होती. तर विघ्नेश खेळताना आरोपीच्या रिक्षात बसला होता. हे आरोपीने पाहिले. त्याने रागाच्या भरात सर्व मुलांच्या समोर त्याच्या पायाला पकडून जमिनीवर आपटले आणि फरफटत पहिल्या मजल्यावर घेऊन गेला. मुलाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून बाजूच्या रहिवाशाला आणि बालकाच्या आजीला ही घटना कळली. तो पहिल्या मजल्यावर मुलाला आपटून मारत होता. आजीने कशीबशी बालकाची त्या राक्षस प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या हातातून सुटका केली. पण या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मिरा रोडच्या व्होकार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असून, मृत्यूशी झुंज सुरू असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT