मुंबई

मुंबईच्या विकासाची गती वाढविणार

CD

मुंबईच्या विकासाची गती वाढविणार
नवनिर्वाचित आयुक्त अश्विनी भिडे यांचा ठाम विश्वास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : ‘शहरासाठी चांगले कामे करण्याचा माझा प्रयत्न राहील. सुदैवाने महापालिकेच्या कामकाजाची मला पूर्ण माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या सहकार्याने चांगले काम करून मुंबईच्या विकासाची गती वाढविणार आहे.’ असा ठाम विश्वास महापालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारताना व्यक्त केला.

मुंबई महापालिका मुख्यालयात नवनियुक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना मावळते पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते पालिका मुख्यालयात पदभार स्वीकारला. याप्रसंगी आयुक्त भिडे यांनी सांगितले की, ‘मुंबई महापालिका नागरिकांना पायाभूत सुविधा देत असते. मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था महिलांसाठी सुरक्षित ठरलेली आहे. मुंबईत नोकरी करणाऱ्या महिलांची प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांचे जीवनमान अधिकाधिक चांगले करण्यासाठी आणि त्यांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशासनामध्ये प्रशासकीय अधिकारी नेहमीच लोकप्रतिनिधींसोबत काम करतो. मधल्या काळामध्ये दीर्घकाळ प्रशासक होते. मात्र, कोविड कालावधीतही पालिकेच्या बैठका होत होत्या. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयामुळेच चांगले काम होऊ शकते. लोकप्रतिनिधी कामाचा अनुभव आहे. लवकरच नालेसफाईचा आढावा घेऊ आणि जास्तीतजास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करू, असेही आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या.

------------------
माझ्या आयुक्तपदाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात मला मुंबई महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे चांगले सहकार्य मिळाले. त्यामुळे मला लोकांपर्यंत पोहोचता आले. विकासकामे करता आली. आता मुंबईच्या विकासाची पताका अधिक उंचावत राहो.
भूषण गगराणी, मावळते आयुक्त, मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT