मुंबई

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर

CD

आरोग्य यंत्रणाच आजारी
रिक्तपदांमुळे ठाणे जिल्ह्याची आरोग्यसेवा कोलमडली; ७१६ पैकी २२८ आरोग्याची पदे रिक्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात आरोग्य विभागच ‘आजारी’ असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात आरोग्य निधीत कपात करण्यात आली असून, विभागात मंजूर ७१६ पदांपैकी २२८ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते तळागाळातील आरोग्य सेवकांपर्यंतच्या जागांचा समावेश आहे.

जिल्ह्यात पाच तालुक्यांत ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १९० उपकेंद्रे आहेत. ‘गाव तेथे गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा’ आणि ‘स्मार्ट पीएचसी’ यांसारख्या उपक्रमांतर्गत २३ केंद्रे विकसित केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच ई-संजीवनी, पोर्टेबल एक्स-रे मशिन्स आणि गरोदर मातांना सोनोग्राफीसाठी ६०० रुपयांची अतिरिक्त मदत अशा सुविधाही जाहीर केल्या आहेत. मात्र, या सुविधा राबवण्यासाठी आवश्यक असणारे कर्मचारीच उपलब्ध नसल्याने या योजना कागदावरच राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी तीन कोटी ७८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, जी मागील तुलनेत कमी आहे. रिक्तपदांच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक फटका महिला आरोग्यसेविकांना बसला आहे. ३३९ पैकी तब्बल १५४ पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील माता-बाल संगोपन आणि लसीकरण मोहिमेवर परिणाम होत आहे.

प्रशासनाचे दावे अन् वास्तव
जिल्हा परिषदेने ग्रामीण जनतेसाठी ई-संजीवनी, स्मार्ट पीएचसी आणि एनक्यूएएस मानांकनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदा तीन कोटी ७८ लाखांची तरतूद प्रस्तावित करून डिजिटल एक्स-रे आणि सोनोग्राफीसाठी मदतीचा हात दिला आहे. मात्र, ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १९० उपकेंद्रांचा डोलारा सांभाळण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेषतः महिला आरोग्यसेविकांची ३३९ पैकी १५४ पदे रिक्त असल्याने माता-बाल संगोपनावर टांगती तलवार आहे.

काय आहे स्थिती?
अर्थसंकल्पीय फटका : आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे उद्दिष्ट असताना निधी कमी केल्याने औषध खरेदी आणि मोहिमांवर परिणाम होणार.
अतिरीक्त ताण : २२८ पदे रिक्त असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे.
तातडीच्या सेवा : गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचे नियोजन असले तरी, प्रत्यक्ष आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे.

रिक्तपदांचा आढावा
पदनाम मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
आरोग्य सेवक (महिला) ३३९ १८५ १५४
आरोग्य सेवक (पुरुष) १३४ ९७ ३७
आरोग्य सहाय्यक (महिला) ३८ १७ २१
वैद्यकीय अधिकारी ८७ ७८ ०९
आरोग्य सहाय्यक (पुरुष) ५० ४७ ०३
एकूण (विभागीय पदे) ७१६ ४८८ २२८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT