मुंबई

महालक्ष्मीच्या दर्शनाची ओढ

CD

महालक्ष्मीच्या दर्शनाची ओढ
डहाणूत आजपासून यात्रा; परराज्यातील भाविक दाखल
कासा, ता. १ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी देवीच्या यात्रेला २ एप्रिलपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पुढील १५ दिवस ही यात्रा भरणार आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी पारंपरिक होम विधी पार पडणार असून, महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली आहे.
डहाणू परिसरात यात्रेनिमित्त मोठी लगबग पाहायला मिळत आहे. विविध प्रकारच्या दुकानांनी परिसर गजबजून गेला आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून मनोरंजनाच्या साधनांपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. उंच झोके, गगनचुंबी पाळणे, ‘मौत का कुआ’, जादूगार, सर्कसमुळे यात्रेला जत्रेचे स्वरूप प्राप्त आले आहे. तसेच कांदे, बटाटे, तेल, भांडी, कडधान्ये, कपडे, कटलरी वस्तू, मिठाई, थंड पेयांची दुकाने सजली आहेत. भुजिंग, मटण, चिकन व मासे यांसारख्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांची विशेष गर्दी दिसून येत आहे. आदिवासी समाजासह इतर नागरिक मोठ्या प्रमाणावर या यात्रेत सहभागी होत असून, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करीत आहेत. अनेक भाविक पायी चालत यात्रेत सहभागी होत आहेत. लहान मुलांचे केस कापण्याचा पारंपरिक विधी करण्यासाठीही मोठी गर्दी होत आहे.
---------------------------------------
ध्वज फडकवण्याची परंपरा
चैत्र पौर्णिमेनिमित्त यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंगरावरील मंदिरावर ध्वज फडकवण्याची परंपरा पार पाडली जाणार आहे. पायथ्याशी असलेल्या महालक्ष्मी मंदिरातून पुजारी मध्यरात्री १२ वाजता ध्वज, पूजेचे साहित्य घेऊन डोंगर चढण्यास सुरुवात करतात. सुमारे ६०० फूट उंचीवरील कळसावर पोहोचून तेथे पूजा करून ध्वज फडकवला जातो. पहाटेपर्यंत हा सोहळा सुरू राहतो. या धार्मिक विधीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
----------------------------------------
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने विविध ठिकाणांहून अतिरिक्त बससेवा सुरू केल्याने यात्रेला येणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. प्रशासनाकडून पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. कासा पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त आहे. यात्रास्थळी चार पोलिस चौक्या, दोन वॉच टॉवर उभारले असून, एक पोलिस निरीक्षक, आठ अधिकारी, १४० पोलिस कर्मचारी, २२० होमगार्ड तैनात तसेच खासगी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
---------------------------
महालक्ष्मीच्या यात्रेला २ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. भाविकांच्या सोयीसुविधा ट्रस्टतर्फे केल्या गेल्या आहेत. दर्शन रांग, पिण्याचे पाणी, जाण्या-येण्याचा मार्ग या सुविधा तयार केल्या आहेत. पर्यटकांनी भाविकांनी सहकार्य करावे.
- संतोष देशमुख, अध्यक्ष. महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT