उद्यानात भटक्या श्वानांचा धुमाकूळ
तळोजा वसाहतीतील नागरिकांमध्ये नाराजी
खारघर, ता. १ (बातमीदार) : तळोजा वसाहत परिसरातील उद्यानांमध्ये भटक्या श्वानांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी येणारे नागरिक, महिला आणि खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांना या श्वानांच्या धुमाकुळामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तळोजा फेज एक आणि दोन परिसरात सिडकोने अनेक सेक्टरमध्ये मैदान आणि उद्यानांसाठी भूखंड उपलब्ध करून दिले आहे. मात्र, पालिकेने सेक्टर नऊ आणि १४ या दोनच ठिकाणी उद्याने विकसित केली आहेत. त्यामुळे या उद्यानात सकाळी व सायंकाळी व्यायाम, फिरणे आणि लहान मुलांच्या खेळासाठी गर्दी असते. मात्र, सेक्टर चौदामधील उद्यानात आठ ते १० भटक्या श्वानांचे टोळके फिरताना दिसत असून, काही वेळा हे श्वान नागरिकांच्या मागे धावत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पालकांनी आपल्या मुलांना उद्यानात पाठवणे टाळले असून, त्यामुळे मुलांच्या खेळण्यावरही परिणाम होत आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांसाठी उद्यान व्यवस्थापनाशी संपर्क केला असता, उद्यानात पालिकेने सुरक्षा रक्षक आणि माळीची नेमणूक केली आहे. मात्र, भटक्या श्वानांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वृक्षांचे नुकसान
वाढत्या उन्हामुळे श्वान थंड जागा शोधण्यासाठी झाडांच्या मुळाशी खड्डे खोदत आहेत. यामुळे बागेतील रोपांचे नुकसान होत आहे. मुले खेळताना भटक्या श्वानाने लहान मुलावर हल्ले केल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
आंदोलनाचा इशारा
उद्यान हे नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी महत्त्वाचे ठिकाण असल्याने ते सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही नागरिकांनी स्पष्ट केले. पालिका प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढावा अन्यथा नागरिकांकडून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यासंदर्भात उपायुक्त वैभव विधाते यांच्याशी संपर्क केला असता, होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.