मुंबई

नफ्याच्या प्रलोभनातून अभियंत्याला गंडा

CD

नफ्याच्या प्रलोभनातून अभियंत्याला गंडा
बोईसर, ता. १ (वार्ताहर) : बोईसर परिसरात जास्त परताव्याचे प्रलोभन दाखवत एका आयटी इंजिनिअरची २९ लाख ७७ हजार २०५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोईसर पूर्वेतील टाटा हाउसिंग शुभगृह सोसायटीत राहणारे शुभम भोळे (वय २७) यांच्याशी ९ ते २० डिसेंबर २०२५ दरम्यान ‘मेघा’ नावाने एका अज्ञात महिलेने संपर्क साधला. मोबाईलद्वारे संवाद साधत तिच्याकडून विश्वास संपादन करण्यात आला. यानंतर फिर्यादीला व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून त्यावर अकाउंट तयार करण्यास सांगण्यात आले. विविध हॉटेल्सच्या जाहिरातींवरील ‘टास्क’ पूर्ण केल्यास गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवण्यात आले. पुढे टेलिग्रामवरील ग्रुपमध्ये सहभागी करून पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार विविध बँक खाते, यूपीआयतून २९ लाख ७७ हजार २०५ रुपये जमा करून घेतल्यानंतर आरोपींनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००च्या कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT