सराटी, महालक्ष्मी पुलावर गैरसोय
कासा, ता. १ (बातमीदार)ः मुंबई़़-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सराटी (चारोटी) तसेच महालक्ष्मी उड्डाणपुलांवरील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले असून, अपघातांची भीती व्यक्त होत आहे.
उड्डाणपुलांच्या खालील सेवा रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अंधारामुळे मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. महालक्ष्मी येथे यात्रा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रवासी, वाहनांची वर्दळ वाढणार आहे. अनेक वाहने सेवा रस्त्यांवर उभी राहत असतात. अशा परिस्थितीत प्रकाशव्यवस्था नसल्याने चोरी, लुटमार किंवा अनुचित प्रकाराची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.