योजना पूर्ण; पाणी मात्र गायब!
जलजीवन मिशनचा फज्जा, आदिवासी महिलांची पंचायत समितीत धाव
कर्जत, ता. १ (बातमीदार) : मार्चअखेर उन्हाची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर पळसरी ग्रामपंचायतीतील वर्णी आदिवासीवाडीतील महिलांनी तीव्र पाणीटंचाईमुळे थेट पंचायत समितीत धाव घेतली. सभापती नमिता घारे यांच्या दालनात जलजीवन मिशन योजनेची बैठक सुरू असतानाच महिलांनी अचानक हजेरी लावत त्यांनी व्यथा मांडली. ‘घरापर्यंत नळजोडणी झाली, पण पाणी मिळत नाही,’ अशी कैफियत त्यांनी सभापती, संबंधित अधिकारी व ग्रामसेवकांसमोर मांडत हालअपेष्टांचा पाढा वाचला.
दरम्यान, वर्णी आदिवासीवाडीत जलजीवन मिशन अंतर्गत अलीकडेच पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. धनेश श्रीखंडे यांच्या नावाने ही योजना पूर्णत्वास गेल्याचे नमूद केले जात असले, तरी प्रत्यक्षात घरोघरी नळजोडणी असूनही पाणीपुरवठा होत नसल्याची गंभीर तक्रार आहे.
महिलांच्या आरोपानुसार, ठेकेदाराने केवळ बिल मंजुरीसाठी तात्पुरत्या स्वरूपात पाणी सोडले; त्यानंतर मात्र नियमित पुरवठा झालाच नाही. परिणामी, ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. याशिवाय, आदिवासीवाड्यांकडे पाणीपुरवठ्याबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही महिलांनी केला.
या घटनेची तातडीने दखल घेत सभापती नमिता घारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ‘ दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून तातडीचे उपाययोजना करता येतील का, यावरही चर्चा करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.