मुंबई

महावीर जयंतीचा मनोरमध्ये उत्साह

CD

महावीर जयंतीचा मनोरमध्ये उत्साह
मनोर, ता. १ ः भगवान महावीर यांची जयंती मनोर येथे भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त जैनबांधवांकडून बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली. जैन देरासर येथून भगवान महावीरांची प्रतिमा सजवलेल्या बग्गीत स्थापित करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. बाजारपेठेतून निघालेली ही मिरवणूक बस स्थानकाला वळसा घालून मशीद गल्ली मार्गे पोलिस ठाणे परिसरातून पुन्हा जैन देरासर येथे पोहोचली.
मिरवणुकीत बॅण्ड पथकाच्या तालावर जैनबांधवांनी उत्साहाने ठेका धरला. पारंपरिक वेशभूषेत सजलेली लहान मुले मुली, डोक्यावर राजस्थानी फेटे परिधान केलेले पुरुष तसेच चुंदडी साड्यांमधील महिला यांचा सहभाग मिरवणुकीला विशेष रंगत आणणारा ठरला. या वेळी उद्योजक सुमति जैन, प्रकाश जैन, महावीर मेहता, विजय सोलंकी, सुरेश जैन, विपुल राठोड, सचिन जैन, भरत जैन, भेरूलाल जैन, रुपेश मेहता तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT