मुंबई

पालिकेच्या तीन शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम

CD

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबईच्या शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महापालिकेने आपल्या तीन शाळांमध्ये सीबीएसई मंडळाशी संलग्न शिक्षण सुरू केले आहे. महासभेच्या मान्यतेनंतर हा निर्णय अमलात आणण्यात आला आहे. यामुळे शहरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.

नेरूळ सेक्टर-५०मधील शाळा क्र. ९३, कोपरखैरणे सेक्टर-११ येथील शाळा क्र. ९४ आणि सारसोळे परिसरातील शाळा क्र. ९८ या ठिकाणी सीबीएसई अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. या शाळांमध्ये २०२६-२७ या आगामी शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी ते नववीपर्यंतच्या वर्गांमध्ये रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही प्रवेश प्रक्रिया निःशुल्क ठेवण्यात आली असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, हा महापालिकेचा उद्देश आहे. त्यामुळे पालिका कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पालकांना दिलासा
महापालिकेच्या या उपक्रमामुळे खासगी शाळांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच सर्वसामान्य पालकांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षकवर्ग आणि सीबीएसई अभ्यासक्रमाचा लाभ मिळणार असल्याने या शाळांना पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT