मुंबई

घणसोली लवकरच होणार क्रीडा हब

CD

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण होण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शैक्षणिक हब अशी ओळख झाल्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये आपले योगदान देण्यासाठी शहर सज्ज झाले आहे. त्यानुसार घणसोली येथे तब्बल ३६ एकर जागेवर अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे शहरातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे घणसोलीची लवकरच क्रीडा हब अशी ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.

घणसोली विभागातील सेक्टर-१२ येथे सुमारे ३६ एकर जागेवर अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक नकाशांना नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागाची मंजुरी मिळाली असून, वास्तुविशारदांकडून सविस्तर प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला आहे. २०२६-२७च्या अर्थसंकल्पात सत्ताधारी भाजपने या प्रकल्पाची घोषणा केली आहे. तसेच या क्रीडा संकुलासाठी एमसीझेडएमए विभागाकडून सीआरझेड परवानगीही प्राप्त झाली असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे १,५०० कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचे काम आदेश दिल्यानंतर पुढील तीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार
या क्रीडा संकुलामध्ये इनडोअर स्टेडियमसह विविध आधुनिक क्रीडा सुविधा उभारण्यात येणार आहेत. खेळाडूंना प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा उद्देश आहे. यामुळे स्थानिक खेळाडूंना दर्जेदार सरावासाठी बाहेर जावे लागणार नाही.

खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ
सध्या नवी मुंबईत बहुद्देशीय क्रीडा संकुल नसल्याने अनेक खेळाडूंना सरावासाठी मुंबई अथवा ठाणे येथे जावे लागते. यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो. अनेक गुणवंत खेळाडूंना इच्छा असूनही आर्थिक कारणांमुळे खेळाचा सराव सोडावा लागतो. मात्र हे क्रीडा संकुल उभारल्यानंतर नवी मुंबईतील खेळाडूंना त्यांच्या शहरातच आधुनिक सुविधा मिळणार आहेत. यामुळे त्यांच्या कौशल्य विकासाला मोठी चालना मिळेल.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन शक्य
३६ एकरांच्या विस्तीर्ण जागेत उभारण्यात येणाऱ्या या क्रीडा संकुलामुळे नवी मुंबईत राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे शहराची ओळख क्रीडा क्षेत्रातही बळकट होणार आहे. एकूणच या प्रकल्पामुळे नवी मुंबई शहर क्रीडा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करणार असून, स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT