मुंबई

आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन

CD

आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन

कासा, ता. १ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कासा येथे आदिवासी साहित्य, संस्कृती आणि बोली भाषेच्या जतन व संवर्धनाच्या उद्देशाने पहिल्यांदाच आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुजा सेवा संस्था, कासा आणि आदिवासी साहित्य परिषद, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (ता. ५) कासा ग्रामपंचायतीच्या बिरसा मुंडा हॉलमध्ये हे संमेलन पार पडणार आहे.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक देवचंद महाले यांची निवड करण्यात आली असून, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डहाणूचे आमदार विनोद निकोले, बोईसरचे आमदार विलास तरे, पालघरचे आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार अमित घोडा तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व अनुसूचित जमाती सदस्य वैदेही वाढाण उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुधीर भोईर करणार आहेत.
संमेलनाच्या पहिल्या चर्चासत्रात ‘आदिवासी साहित्य व बोली भाषेचे संवर्धन आणि विकास’ या विषयावर सखोल चर्चा होणार आहे. या सत्रात सुनील झळके, सखाराम डाखोरे, नितीन बोंबाडे आणि डॉ. किशोर डोके हे साहित्यिक सहभागी होणार असून, सत्राचे सूत्रसंचालन रवि बुधर करणार आहेत.

त्यानंतर दुसऱ्या सत्रात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या संमेलनाचे अध्यक्ष कवी रवि बुधर असतील, तर सूत्रसंचालन कवी किशोर डोके करतील. या सत्रासाठी ममता गडग, माया खोटरे, चेतन अंधेर, कृष्णा राऊत, ज्ञानेश्वर गावित, विशाल भोये यांच्यासह अनेक कवी सहभागी होणार आहेत. या संमेलनामुळे आदिवासी साहित्य आणि संस्कृतीला नवी दिशा मिळणार असून, स्थानिक कलाकार व साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT