मुंबई

नवी मुंबईत सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ

CD

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : शहरात सोनसाखळी लुटारूंनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, अवघ्या ४८ तासांत कोपरखैरणे आणि रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन महिलांच्या अंगावरील सुमारे पाच लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याचे उघडकीस आले आहे. या लुटारूंनी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या आणि कामावरून घरी परतणाऱ्या महिलांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.

घणसोली सेक्टर ७ मध्ये राहणारी विवाहित रविवारी (ता. २९) रात्री सेक्टर ९ मधून शिक्षिकेकडून पुस्तके घेऊन मुलीसह घरी जात होती. ती मोरया ज्वेलर्ससमोरून जाताना, दुचाकीवरून आलेल्या दोघा लुटारूंनी विवाहितेच्या मानेवर जोरात थाप मारून हिसका दिला. तसेच तिच्या अंगावरील दोन लाख ५५ हजारांचे मंगळसूत्र लुटून पलायन केले. त्यामुळे विवाहितेच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

बोनकोडे गावातील चंद्रमा सोसायटीसमोर सोमवारी (ता. ३०) सकाळी फिर्यादी महिला कामावर जाताना स्कुटीवरून मास्क लावून आलेल्या दोघा लुटारूंनी तिच्या गळ्यातील दोन लाख ३० हजारांची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. तिसरी घटना मंगळवारी (ता. ३१) रात्री कोपरखैरणे सेक्टर ९ येथील एकता हाउसिंग सोसायटीसमोर घडली. फिर्यादी महिला आपल्या नातेवाइकासह शॉरमा खाण्यासाठी थांबली असताना, पायी आलेल्या एका लुटारूने त्यांच्या गळ्यातील दीड लाखाची सोन्याची चेन खेचली. त्यानंतर मोटारसायकलवर दबा धरून बसलेल्या आपल्या साथीदारासह पळून गेला. या तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कोपरखैरणे आणि रबाळे पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

SCROLL FOR NEXT