गोवंडीतील शिवाजीनगरात कचऱ्याचा ढीग; नागरिक त्रस्त
चेंबूर, ता. ३ : गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात हनुमान मंदिरासमोर गेल्या अनेक दिवसांपासून कचरा न उचलल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शिवाजीनगर हा दाट लोकवस्तीचा आणि सतत वर्दळीचा परिसर आहे. आधीच डम्पिंग ग्राउंडमुळे प्रदूषणाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता साचलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे.
यासंदर्भात स्थानिकांनी पालिकेच्या एम-पूर्व विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली असली, तरी अद्याप कचरा उचलण्याची कारवाई झालेली नाही. दरम्यान, पालिकेने तातडीने लक्ष घालून परिसरातील स्वच्छता व्यवस्था सुधारावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.