मुंबई

घारापुरी बेटावर १,५०० वर्षांपूर्वीच्या विहिरी

CD

उरण, ता. १ (बातमीदार) : एलिफंटा बेटावर सुरू असलेल्या उत्खननात उत्तरेकडे पायऱ्यांच्या एका उभ्या जोडणीशी (जंक्शन) जोडलेले एक आयताकृती जलाशय (टी-आकाराची पायऱ्यांची विहीर) सापडले आहे. या शोधामुळे बेटावरील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धतीवर प्रकाश पडला असून सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीची विहीर असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते, ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण शोध आहे; कारण बेटावर प्रसिद्ध असलेल्या इतर अनेक वास्तूंप्रमाणे हे जलाशय खडकात कोरून बनवलेले नाही, तर बेटावरील रहिवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आणि पावसाळ्यातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करता यावे, या उद्देशाने याची विशेष रचना करण्यात आली आहे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक, पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. अभिजित आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली, बेटाच्या पूर्व बाजूकडील मोराबंदर परिसरात एक पथक काम करत आहे. बेटावरील प्राचीन वसाहतींचे स्वरूप आणि विस्तार निश्चित करण्यासोबतच त्यांचा कालक्रम (इतिहास) प्रस्थापित करणे हा या कामाचा उद्देश आहे. या स्थळाची लांबी सुमारे १४.७ मीटर असून रुंदी ६.७ मीटर आणि १०.८ मीटर आहे. यामुळे या वास्तूला टी आकाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उत्खननाचे काम आतापर्यंत पाच मीटर खोलीपर्यंत पोहोचले असून, त्यामध्ये पायऱ्यांच्या २० पायऱ्या उजेडात आल्या आहेत. या पायऱ्या दगडांच्या ठोकळ्यांपासून बांधण्यात आल्या आहेत आणि विशेष म्हणजे हे दगड एलिफंटा बेटावरील नाहीत, असे आंबेकर सांगतात.

एलिफंटा बेट हे खडकात कोरलेल्या अद्भुत वास्तूंसाठी (लेण्यांसाठी) ओळखले जाते; यापूर्वीही येथे पाण्याचा साठा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या टाक्या सापडल्या आहेत; परंतु येथे पाण्यासाठी अत्यंत विचारपूर्वक आणि कुशलतेने केलेली वास्तुरचना पाहायला मिळते. बेटावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात पडत असले, तरी येथील जमिनीचा पृष्ठभाग खडकाळ असल्यामुळे पाण्याचा जमिनीत झिरपण्याचा वेग खूपच कमी असतो आणि बहुतांश पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळते, असे आंबेकर स्पष्ट करतात.

११ नाण्यांचा शोध
पावसाळा संपल्यानंतर ज्या बेटावर पाण्याची टंचाई निर्माण होते, अशा ठिकाणी अशा प्रकारच्या जलसाठवणूक वास्तूंची नितांत गरज असते. तसेच या शोधामध्ये ११ नाणी सापडली आहेत. त्यामध्ये पाच शिशाची आणि सहा तांब्याची अशी आहेत, तसेच सिरॅमिक आणि काचेच्या वस्तू सापडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT