मुंबई

भूसंपादन मोबदल्यावरून शेतकरी आक्रमक

CD

भिवंडी, ता. १ (वार्ताहर) : ठाणे-गायमुख ते खारबाव मार्गावरील नागले, पाये व खार्डी परिसरात उभारण्यात येणाऱ्या कोकण द्रुतगती मार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. अत्यल्प मोबदला दिला जात असल्याच्या निषेधार्थ बुधवारी पोलिस बंदोबस्तात सुरू असलेले सर्वेक्षण शेतकऱ्यांनी रोखले.
या प्रकल्पामुळे पाये, पायगाव, खार्डी आणि नागले गावांतील शेकडो एकर शेती बाधित होत आहे. मात्र, बाजारभावाच्या तुलनेत अतिशय कमी मोबदला देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. ‘शेतकरी राजा हितकारी संस्था’च्या माध्यमातून स्थानिकांनी यापूर्वीही दोनदा सर्वेक्षणाला विरोध केला होता. शेतकरी अरुण जाधव यांनी प्रति गुंठा किमान २० लाख रुपयांचा मोबदला देण्याची मागणी केली. सध्याचा १.२१ लाख रुपयांचा मोबदला अन्यायकारक असून जमीन गेल्यास आम्ही भूमिहीन होऊ, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, ६ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT