ऋषिकेश मेहेरची सुवर्ण कामगिरी
विरार, ता. १ (बातमीदार) : वसईच्या कळंब गावातील ऋषिकेश मेहेरने पिंपरी-चिंचवड येथे पार पडलेल्या शरीरयष्टी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेचे ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाच्या विद्यमाने इंडियन बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिटनेस फेडरेशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ऋषिकेशने तीन पदके प्राप्त केली. या स्पर्धेत त्याने ज्युनियर नॅशनल क्लॉसिक फिजिक्स व ज्युनियर नॅशनल मेन्स फिजिक्समध्ये सुवर्णपदक जिंकले, तर त्याने ज्युनियर नॅशनल बॉडी बिल्डिंगमध्ये तृतीय क्रमांकासह कांस्यपदक पटकावत दमदार कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीबद्दल वसई तालुक्यातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.