श्री हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात
घाटकोपर, ता. १ (बातमीदार) : चांदिवली विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १६१ अंतर्गत टिळकनगर, साकीनाका येथे नवक्रांती युवा मित्र मंडळाच्या पुढाकारातून जीर्णोद्धार करण्यात आलेल्या भव्य व सुसज्ज श्री हनुमान मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात झाला. शिवसेना चांदिवली विधानसभा प्रभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली होती.
या सोहळ्याचे आयोजन आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून व त्यांच्या हस्ते करण्यात आले. बुधवार (ता. १) सकाळी १० वाजता श्री गणपती मंदिर ते हनुमान मंदिर, टिळकनगर अशा भव्य कलश मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या मिरवणुकीत स्थानिक भाविक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यानंतर सकाळी ११.३० वाजता गणेश व भोलेनाथ हाउसिंग सोसायटी, अनिस कंपाउंड, टिळकनगर, साकीनाका येथे जीर्णोद्धारित श्री हनुमान मंदिरात प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण विधी वैदिक मंत्रोच्चारात झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.