मुंबई

वाशीत अनधिकृत गॅस सिलिंडर साठ्यावर कारवाई

CD

वाशीत अनधिकृत गॅस सिलिंडर साठ्यावर छापा
१३ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त
ठाणे, ता. २ : शासकीय नियमांचे उल्लंघन करून अनधिकृतरीत्या गॅस सिलिंडरची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या वाशी येथील एका एजन्सीवर शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत १२३ गॅस सिलिंडरसह एकूण १३ लाख ९१ हजार ३२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वाशी येथील सेक्टर ११, साई बाबा आर्केड इमारतीमधील ‘राईट कनेक्शन’ या बिगर-घरगुती (नॉन-डोमेस्टिक) एजन्सीमध्ये हा अवैध प्रकार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती शिधावाटप विभागाला मिळाली होती. त्यानुसार उपनियंत्रक, शिधावाटप ‘फ’ परिमंडळ, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाड टाकली. कारवाईदरम्यान संबंधित एजन्सीने इमारतीच्या बाहेर बंद वाहनांमध्ये भरलेले आणि रिकामे सिलिंडर साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले. पथकाने एकाच वेळी टेम्पो आणि कार्यालयावर छापा टाकून ५५ भरलेले आणि ६८ रिकामे असे एकूण १२३ सिलिंडर जप्त केले. यासह चार टेम्पो जप्त करून संपूर्ण मुद्देमाल सीलबंद करण्यात आला आहे.

जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई
याप्रकरणी दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन वाशी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात ‘जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५’ अंतर्गत पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती शिधावाटप कार्यालयाने दिली आहे. शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून धोकादायक पद्धतीने सिलिंडर साठवणाऱ्यांवर ही मोठी कारवाई मानली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT