मुंबई

शिक्षिकेवरील छळप्रकरणी तपासाची गती प्रश्नांकित

CD

शिक्षिकेच्या छळ प्रकरणाच्या
तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : एका शिक्षिकेला अश्लील संदेश व व्हिडिओ पाठवून शरीरसंबंधांसाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शाळेच्या विश्वस्ताच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पोलिसांच्या कारवाईच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
संबंधित शिक्षिकेला सरवना अय्यर याने वारंवार अश्लील संदेश पाठवण्यास सुरुवात केली. त्यानंतर अश्लील व्हिडिओ पाठवून शरीरसंबंधाची मागणी केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या त्रासाला कंटाळून शिक्षिकेने आपल्या आईसह मनसे पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यानंतर मनसेच्या हस्तक्षेपानंतर मानपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हा नोंदवला; मात्र कारवाईत त्याला नोटीस बजावून सोडण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले असले तरी कठोर कारवाईचा अभाव जाणवत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
शैक्षणिक व सांस्कृतिक ओळख असलेल्या डोंबिवलीत घडलेल्या या प्रकारामुळे चिंता व्यक्त होत असून पीडित शिक्षिकेला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT