मुंबई

दागिने चोरांची धरपकड अटक

CD

दागिने चोरांची धरपकड
कासा पोलिसांकडून मुद्देमाल हस्तगत
कासा, ता. २ (बातमीदार)ः प्रवासादरम्यान एका महिलेचे दागिने चोरणाऱ्या चौघांना कासा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रायगड जिल्ह्यातील आंबोली कुडली येथील कुसुम धनवडे (वय ७०) ३० मार्च रोजी गुजरात परिवहन मंडळाच्या बसने सुरत ते महाड असा प्रवास करीत होत्या. सकाळी ११.३५ वाजता कासा पोलिस ठाणे हद्दीतील धनिवरी (ता. डहाणू) येथील हॉटेल तुलसी येथे थांबली. त्यांच्या सीटखाली बॅगेतील दोन लाख ३८ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तींनी चोरल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच कासा पोलिस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सखोल तपासणीअंती शिवा कावडीया (रा. सुरत, गुजरात), कार्तिक नायडू, विक्रम नायडू, रमेश नायडू (तिघेही रा. नवापूर, जि. नंदूरबार) यांना अटक केली.
-------------------------------------
पथकाची चोख कामगिरी
पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमर पाटील, पोलिस उपनिरिक्षक किशोर पवार तसेच पोलिस कर्मचारी संदीप चव्हाण, जाधव, धांगडा, गांगुर्डे यांच्या पथकाने शोधमोहीम राबवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayor Manjusha Nagpure : पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर, 'या' 227 ठिकाणांसाठी नवा प्लॅन

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT