मुंबई

दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

CD

पाणीगळती रोखण्याची धडपड
वांद्री धरणाच्या कालव्यांच्या दुरुस्ती अंतिम टप्प्यात
मनोर, ता. २ (बातमीदार) ः वांद्री धरणाच्या डाव्या, उजव्या कालव्यांवरील १०४ मोऱ्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामामुळे कालव्यामधून होणारी गळती रोखण्यासाठी मदत होणार असल्याने काही गावांमधील पाणीटंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करता येणार आहे.
पालघर तालुक्यातील गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीत वांद्री धरणातील पाणी पंचक्रोशीतील गावांमधील शेतीच्या सिंचनासाठी सोडले जाते. डाव्या, उजव्या कालव्यांमार्फत सोडण्यात येणाऱ्या पाण्याने दोन हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येते. खरीप हंगाम पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे डिसेंबर अखेरीस सिंचनासाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात भातपिकाची लागवड केली जाते. सूर्या प्रकल्पाअंतर्गत ऐंशीच्या दशकात वांद्री नदीवर मातीचे बांधकाम असलेले ३५ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेले वांद्री धरण बांधण्यात आले होते. याच कालावधीत उजव्या कालव्यामार्फत धरणापासून पारगाव सोनावेपर्यंत तर डावा कालव्यातून हालोली गावाच्या पाडोस पाड्यापर्यंत धरणाचे पाणी पोहचवण्यात आले होते.
------------------------------
शेतीचे नुकसान
- कालव्यांमधून होणाऱ्या पाणीगळतीमुळे सिंचन क्षेत्र घटले होते. रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले होते. रब्बी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची वेळ पाटबंधारे विभागावर ओढवली.
- पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन कालव्यालगतच्या शेतीच्या नुकसानीमुळे हालोली गावाच्या हद्दीतील दुरुस्तीच्या कामाला शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे पाइप बदलण्याचे निर्देश दिले होते.
-------------------------------
वांद्री धरणाच्या दोन्ही कालव्यांची दुरुस्तीची कामे प्रस्तावित होती. त्यानुसार उजव्या, डाव्या कालव्यावरील १०४ ठिकाणच्या मोऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी तीन कोटी १८ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
- नीलकमल गवई, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT