मुंबई

जरीमरी तिसाई देवस्थानच्या चैत्री जत्रोत्सवाला सुरूवात

CD

जत्रोत्सवात कुस्त्यांचा जंगी आखाडा
पालखी मिरवणुकीने तिसगावचा परिसर दुमदुमला

कल्याण, ता. २ (बातमीदार) : कल्याण पूर्व भागातील श्रद्धास्थान असलेल्या तिसगाव येथील प्रसिद्ध जरीमरी तिसाई देवस्थानचा चैत्री जत्रोत्सव गुरुवारपासून (ता. २) मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी तिसगाव ग्रामस्थ मंडळ आणि नियोजन समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कुस्तीचे सामने आयोजित केले जातात.

गुरुवारी पहाटे ६ वाजता देवीचा अभिषेक आणि विधिवत पूजा करून उत्सवाला प्रारंभ झाला. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेली जरीमरी तिसाई मातेची भव्य पालखी मिरवणूक गुरुवारी सायंकाळी काढण्यात आली, ज्यामध्ये परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी ७.३० वाजता हनुमान जयंतीनिमित्त विशेष धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या दोन दिवसांच्या सोहळ्यात हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, सर्व भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तिसगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाप्रसादाचे आयोजन
जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी (ता. ३) सकाळी अभिषेक, पूजा आणि आरतीचे कार्यक्रम पार पडतील. दुपारी १२ वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, कुस्तीप्रेमींसाठी दुपारी ४ वाजल्यापासून गावदेवी मंदिराच्या प्रांगणात कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन केले आहे. यामध्ये अनेक नामवंत मल्ल आपले कसब दाखवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT