मुंबई

अलिबागमधील रक्तदान शिबिरात १६१ जणांचे रक्तदान

CD

अलिबागमधील रक्तदान शिबिरात १६१ जणांचे रक्तदान
अलिबाग, ता. २ (वार्ताहर) : भगवान महावीर जयंतीनिमित्त कच्छीभवन ट्रस्ट अलिबाग आणि लायन्स क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कच्छ युवक संघ, ऐकरवाला रक्तदान शिबिराचे आयोजन मंगळवारी (ता. ३१) अलिबागमधील कच्छी जैन भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरामध्ये अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, नगरसेवक अनिल चोप्रा, अलिबागचे निरीक्षक किशोर साळे, लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, गिरिश म्हात्रे, महेश कवळे, कच्छी भवन ट्रस्टचे धिरेंद्र काराणे, केतन शहा, धर्मेश देढिया, साई मोटर ट्रेनिंग स्कूलचे मेहूल पाटील, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे अधीक्षक संग्राम माकर, वैद्यकीय समन्वयक चिन्मय तळेकर आदी उपस्थित होते.
तसेच, या रक्तदान शिबिरामध्ये प्रशांत नाईक मित्रमंडळ, लायन्स क्लब अलिबाग डायमंड, अलिबाग रेवस मिनिडोर संघटना, अलिबाग ऑटो रिक्षा संघटना, आगरी समाज संस्था अलिबाग, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, माणुसकी प्रतिष्ठान आणि मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अलिबाग या संस्थांनीदेखील सहभाग नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Marathi News: तिसऱ्यांदा चुकला तरी श्रेयस अय्यरवर होणार नाही बंदीची कारवाई, पण...; आयपीएलचा नवा नियम घ्या जाणून

Dindori : कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर बुजवण्यास सुरुवात, मालकावर गुन्हा दाखल

Fake Caste Certificate: बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण! २० वर्षांनी गुन्हा दाखल, पण वेळ निघून गेली

'या' मराठी अभिनेत्रीने 19 व्या वर्षी केलेलं लग्न; परपुरुषासोबत परदेशात गेली पळून पण रस्त्यावर राहण्याची आली वेळ

Latest Marathi News Live Update : सोनाराला फसवून 30 ग्रॅम सोनं चोरलं

SCROLL FOR NEXT