पडघा, ता. २ (बातमीदार) : पडघा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने हनुमान जयंती विविध आध्यात्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारातील हनुमान मंदिरात हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला.
कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी अभिषेक, महाआरती, सत्यनारायण पूजा; तसेच महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला वनकर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थिती लावली. या वेळी जय हनुमान प्रासादिक नवतरुण संगीत भजन मंडळाचे भजनसम्राट भगवान बुवा भोईर यांनी सादर केलेल्या सुश्राव्य भजनांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या भजनामुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत आली. कार्यक्रमादरम्यान वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी; तसेच त्यांच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.