मुंबई

पूर संकटांसाठी महापालिका सज्ज

CD

पूर संकटांसाठी महापालिका सज्ज
वसई-विरार महानगर क्षेत्रात २२३ कोटींची कामे

वसई, ता. २ (बातमीदार) : पावसाळा आला की जलमय होणाऱ्या वसई-विरार शहरातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने मोठी पावले उचलली आहेत. शहरातील पाणी निचरा व्यवस्था सक्षम करण्यासाठी २६३ ठिकाणी आरसीसी गटारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी २२२.८३ कोटी रुपये खर्च येणार आहे.

गेल्या काही वर्षांत शहरातील पूरस्थिती गंभीर बनली आहे. विशेषतः सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण, बेकायदा माती भराव तसेच अनियंत्रित बांधकामे यामुळे पाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. परिणामी, वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव परिसरातील अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरणे, वाहतूक विस्कळित होणे आणि दैनंदिन जीवन ठप्प होणे अशा समस्या वारंवार उद्भवत आहेत.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने तज्ज्ञ संस्थांची मदत घेतली होती. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्या माध्यमातून शहराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यासाठी सुमारे १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, त्यांच्या अहवालानुसार पावसाचे पाणी साठू नये आणि निचरा सुरळीत व्हावा यासाठी विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
-------------------------------------------------
महापालिकेच्या नव्या आराखड्यानुसार शहरातील जुन्या व अरुंद नाल्यांचे रुंदीकरण करून त्यांची क्षमता वाढवली जाणार आहे. तसेच, हे नाले मुख्य खाडी किंवा मोठ्या जलवाहिन्यांशी जोडले जाणार आहेत, जेणेकरून पाण्याचा प्रवाह अडथळ्याविना सुरू राहील. पाणी साचणाऱ्या ‘हॉटस्पॉट’ भागांची ओळख पटवून त्या ठिकाणी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामुळे सखल भागांतील पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
---------------
सरकारी नाले वगळता इतर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात येणार आहे. ही अतिक्रमणे हटवून तेथील प्रवाह मोकळा केला जाईल, असे संबंधित विभागाला तातडीचे आदेश दिले आहेत.
- अजीव पाटील, महापौर, वसई-विरार महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT