मुंबई

कारची काच फोडून १३ लाखांचा ऐवज लंपास

CD

पनवेल, ता. २ (वार्ताहर) : रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने प्रवासात असलेल्या एका कुटुंबाची कार हॉटेलबाहेर पार्क केलेली असताना, चोरट्यांनी वाहनाची काच फोडून त्यातील १३ लाख ७३ हजारांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना पनवेलमधील गो ग्रीन हॉटेल येथे बुधवारी (ता. १) दुपारी घडली. पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घाटकोपर येथील रहिवासी योगेश रमेश शिंदे (वय ४१) हे बुधवारी सकाळी आपल्या कुटुंबासह गाडीने रत्नागिरीहून मुंबईला परतत होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शिंदे कुटुंबीय कल्ले गाव येथील गो ग्रीन हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबले होते. शिंदे यांनी गाडी हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. याच कालावधीत चोरट्याने शिंदे यांच्या गाडीची काच फोडून गाडीत ठेवलेल्या पर्समधील १० तोळ्यांचे मंगळसूत्र, आठ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या आणि चार तोळ्यांची सोन्याची पाटली तसेच ५० हजारांची रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. जेवण झाल्यानंतर शिंदे कुटुंबीय दीड तासानंतर आपल्या गाडीजवळ परतले असता, त्यांना गाडीच्या डाव्या बाजूची पाठीमागील काच फुटलेली दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : KKR ला मोठा धक्का! सर्वाधिक धावा करणारा फलंदाज स्पर्धेतून बाहेर; प्ले ऑफच्या शर्यतीत आता तग कसा धरणार?

काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षांची नियुक्ती! पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी; ६९ जणांचा समावेश

Physics NEET Paper Leak Case : नीट फिजीक्सचा पेपर फोडणाऱ्या महिलेचे नाव समोर, सीबीआयची पुण्यात मोठी कारवाई; तीसरी पण 'मनिषा'च शोधली

America-Iran War: अमेरिका-इराण युद्ध केवळ पाच सेकंदात संपू शकतं; जागतिक वित्तीय संस्था 'जेफरीज'चा खळबळजनक दावा

Farmer loan waiver Maharashtra : शेतकरी कर्जमाफी आचारसंहितेत अडकणार का? पूर्वतयारी अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांनी गुपीत फोडलं

SCROLL FOR NEXT