IPL 2026 : KKR ला मोठा धक्का! सर्वाधिक धावा करणारा फलंदाज स्पर्धेतून बाहेर; प्ले ऑफच्या शर्यतीत आता तग कसा धरणार?

Angkrish Raghuvanshi ruled out of IPL 2026: आयपीएल २०२६ च्या प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा सर्वाधिक धावा करणारा युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
Angkrish Raghuvanshi ruled out of IPL 2026

Angkrish Raghuvanshi ruled out of IPL 2026

esakal

Updated on

Angkrish Raghuvanshi concussion and finger fracture update: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफसाठीच्या एका जागेसाठी शर्यतीत असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. १३ सामन्यांत १३ गुणांसह अजूनही KKR प्ले ऑफच्या शर्यतीत आहे. त्यांना इतर संघांच्या मदतीची गरज लागणार असली तरी अजिंक्य रहाणेच्या संघाला अंतिम चारमध्ये स्थान पटकावण्याची आशा आहे. अशात त्यांचा प्रमुख फलंदाज अंगकृश रघुवंशीने IPL 2026 मधून माघार घेतली आहे. त्याने KKR साठी या पर्वात सर्वाधिक ४२२ धावा केल्या होत्या. मागील सामन्यात त्याच्या हाताला दुखापत झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com