मुंबई

धारावीत ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभल’

CD

धारावीत ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’
पालखी सोहळ्यात भाविकांची गर्दी
धारावी, ता. २ (बातमीदार) : महाराष्ट्राचे कुलदैवत जोतिबा यांच्या यात्रेनिमित्त धारावीत ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ असा जयघोष करत गुलाल व खोबऱ्याची उधळण करण्यात आली. धारावी क्रॉस रोड, शिवनारायण बावडी येथील ऐतिहासिक मंदिर परिसरात गुरुवारी मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला.
मंदिरात पहाटे काकड आरती, दुग्धाभिषेक, होमहवन आणि इतर पूजाविधी करण्यात आले. हिंदभूमी क्रीडा मंडळ आणि शिंदे परिवारातर्फे या उत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कर्नाटकातील मूळ गावे असलेले अनेक भाविक मुंबईत वास्तव्यास असल्याने ते येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
धारावी, पनवेल, कल्याण, वसई-विरार तसेच लालबाग आणि भायखळा परिसरातूनही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेली ‘सासनकाठी’ मोठ्या जल्लोषात मिरवण्यात आली. ही काठी मंदिरातून निघून धारावी मुख्य रस्ता, कोळीवाडा, मुकुंद नगर, काळा किल्ला मार्गे फिरून संत रोहिदास मार्ग आणि संत कक्कया मार्गावरून पुन्हा शिवराज उद्यान मार्गे मंदिरात परत आणण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT