मुंबई

टोरंट जलविद्युत प्रकल्प विरोधात ठाकरे गट आक्रमक

CD

टोरंट जलविद्युत प्रकल्प विरोधात ठाकरे गट आक्रमक
प्रकल्प स्थगितीसाठी निवेदने, आंदोलनाचा इशारा
कर्जत, ता. २ (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पाविरोधात स्थानिकांसह आता ठाकरे गटानेही जोरदार भूमिका घेतली असून गुरुवारी (ता.२) विविध शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने सादर करण्यात आली.
कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतल खलाटी, साई डोंगर, भालिवडी, ढाक बहीरी परिसरात प्रस्तावित असलेल्या टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधात विरोधाची तीव्रता वाढत असून आता ठाकरे गटानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी तहसीलदार, प्रांत अधिकारी, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला निवेदने देत प्रकल्प तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली.
या प्रकल्पासाठी वनविभागाच्या सुमारे ६०० एकर जमिनीचा वापर होणार असून अंदाजे २.५० ते ३ लाख झाडांची कत्तल होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
पंचायत समिती कर्जतच्या उपसभापती चित्रा ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकल्पामुळे पाली व पोटल ग्रामपंचायत हद्दीतील जनजीवन विस्कळीत होणार असून विशेषतः आदिवासी नागरिकांचे मोठे नुकसान होईल. त्यांच्या जमिनी, उपजीविका आणि नैसर्गिक साधनसंपत्ती धोक्यात येणार आहे. प्रकल्पासाठी जमिनीखाली २५० ते ३०० फूट खोल खड्डे व दरीसदृश विहिरी खोदल्या जाणार असून त्यामुळे परिसरात भूकंपसदृश हादरे बसण्याची शक्यता आहे.
प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या वीज व पाण्याचा स्थानिकांना फायदा न होता तो इतर शहरांना पुरवठा केला जाणार असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता जेसीबी व पोकलनच्या सहाय्याने ब्लास्टिंगची कामे सुरू असल्याचा आरोप करत हे काम बेकायदेशीर असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक परवानगी घेतल्या आहेत का, याबाबत पारदर्शकता नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
हा प्रकल्प तात्काळ थांबवावा, अन्यथा ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ‘स्टाईल’मधील आंदोलनाची शक्यता निर्माण झाल्याने प्रशासन आणि जनतेचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT