जेसीबीच्या धक्क्याने गॅसवाहिनी फुटली
डोंबिवली, ता. २ : एमआयडीसीमधील निवासी क्षेत्र असलेल्या मिलापनगर परिसरात गुरुवारी (ता. २) दुपारी मोठी खळबळ उडाली. एमआयडीसीच्या गटाराचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसची मुख्य वाहिनी (पाइपलाइन) फुटल्याची घटना घडली. खबरदारीचा उपाय म्हणून गॅसपुरवठा तातडीने बंद करण्यात आल्याने शेकडो कुटुंबांच्या स्वयंपाकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिलापनगर येथील प्लॉट क्रमांक आरएल-२५ जवळ हे काम सुरू होते. जेसीबीचालकाचा अंदाज चुकल्याने वाहिनीला जोराचा धक्का लागला आणि गॅसगळती सुरू झाली. गॅस कंपनीच्या तांत्रिक पथकाने तातडीने धाव घेत मुख्य पुरवठा खंडित केला.
संबंधित ठेकेदाराकडून वारंवार अशा चुका होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. ३१ जानेवारी रोजी याच परिसरात जेसीबीच्या धक्क्याने झाड कोसळून महावितरणचे नुकसान झाले होते. या निष्काळजीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी राजू नलावडे यांनी संताप व्यक्त करत ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. एमआयडीसीचे उपअभियंता एस. आर. दरेकर यांनी सांगितले की, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पुढील दीड ते दोन तासांत मिलापनगरचा गॅसपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.