मुंबई

मुरबाड तालुक्यात वाऱ्यासह मुसळधार

CD

मुरबाड तालुक्यात वाऱ्यासह मुसळधार

मुरबाड (बातमीदार) : माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या न्याहाडी आणि टोकावडे परिसरात गुरुवारी (ता. २) सायंकाळी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले असले तरी शेतकरी आणि वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात एकच तारांबळ उडाली. या पावसात शेतकऱ्यांनी आपल्या गुरांसाठी साठवून ठेवलेली वैरण भिजल्याने चारा खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, वीटभट्ट्यांवरील कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यातील वैशाखरे आणि धसई परिसरातही जोरदार वाऱ्याने धुमाकूळ घातला. या भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष आप्पा घरत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Andekar Gang Case : पुणे बालाजीनगर गोळीबार प्रकरणात अखेर आंदेकर टोळीवर गुन्हा; अक्षय म्हस्केच्या हत्येचा कट उघड?, आरोपींचा शोध सुरू

रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ११९१ अप्रेंटिस पदांसाठी भरतीप्रक्रिया जाहीर; अर्ज कुठे आणि कसा करायचा?

Warkari Row: वारकरी संप्रदायावरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात विकास लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण रद्द

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील तपास करणारे सी बी आय अधिकारी पुण्यात

Pune Politics : नगरसेवकांच्या नातेवाईकांच्या नावाने सार्वजनिक जागांचे नामकरण थांबवण्यासाठी नागरिकांची राज्य सरकारकडे धाव

SCROLL FOR NEXT