पेण तालुक्यात हनुमान जन्मोत्सव
पेण, ता. २ (वार्ताहर) : पेणमध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये सर्वत्र भजन, कीर्तन, हरिपाठ तसेच अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन मंदिर व्यवस्थापनेकडून करण्यात आले होते.
सकाळपासूनच हनुमान मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. शहरासह तालुक्यात असणाऱ्या हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरांला रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरातील व्यापारी विजय वक्तरमल जैन, हेमंत जैन, देवेंद्र जैन यांच्या कुटुंबाच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या ठिकाणी असंख्य भाविकांनी गर्दी केली होती.यासह कासार आळी येथील पुरातन मंदिरातील ५ फुटी हनुमान टिपेचा मारुती तसेच हमरापूर येथील पुरातन असलेल्या बजरंगबली हनुमान मंदिर, कुंभार आळी येथील हनुमान मंदिरात येथेही हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हनुमानाच्या पालखीत मोठा जनसमुदाय सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.