आरडीसीसी बँकेला ८७ कोटी नफा
७१०५ कोटींचा व्यवसाय; सलग दुसऱ्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग, ता.२ : सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कामगिरीच्या जोरावर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (आरडीसीसी) आर्थिक वर्षअखेर उल्लेखनीय प्रगती साधत ८७.१५ कोटी रुपयांचा ढोबळ नफा कमावला आहे. सलग दुसऱ्या वर्षी ८० कोटींपेक्षा अधिक नफा नोंदवत बँकेने आर्थिक स्थैर्य सिद्ध केले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ७१०५.३३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
बँकेच्या आकडेवारीनुसार ठेवी ४०३७.१४ कोटी रुपये, तर कर्जवाटप ३०६८.१९ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. स्वनिधीचा आकडा ७७७.१० कोटी रुपये झाला आहे. २०२२ मधील ३८४६.५८ कोटी रुपयांच्या तुलनेत २०२६ मध्ये व्यवसायात सुमारे ८५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
‘डिपॉझिट ग्रोथ वर्ष’ उपक्रमांतर्गत ठेवी वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असून शेतकरी, व्यापारी व बचतदारांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी ग्राहकांचा विश्वास व कर्मचाऱ्यांच्या समर्पणामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे सांगि
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.