मुंबई

मुरबाड तालुक्याला अवकाळीचा तडाखा

CD

मुरबाड तालुक्याला अवकाळीचा तडाखा
आंबा बागांसह घरांचे मोठे नुकसान
मुरबाड, ता. ३ : तालुक्यातील टोकावडे, मोरोशी, शिरोशी आणि धसई विभागांत गुरुवारी (ता. २) सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा, चिकू उत्पादक, भाजीपाला शेतकरी आणि वीट उत्पादकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

वादळामुळे आंब्याच्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात गळून पडल्या आहेत. खेड येथील मोरेश्वर मोरे, टोकावडे येथील प्रकाश पवार आणि सोनावळे येथील सुभाष भोईर यांच्यासह अनेक बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे, पावसामुळे वीट उत्पादकांच्या कच्च्या विटा भिजून नुकसान झाले असून भाजीपाला पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.

घरांची पडझड व मालमत्तेची हानी
तालुक्यातील विविध गावांमध्ये वादळाचा जोर अधिक होता. खरशेत येथील दुंदा रघुनाथ पवार व मंगल माधवी यांच्या घरांचे नुकसान झाले. मोरोशी येथे मोहन देशमुख यांच्या पोल्ट्री फार्मची भिंत कोसळली, तर फांगुळ गव्हाण येथील पालो सोंगाळ यांच्या घराची कौले उडाली असून स्थानिक समाज मंदिराचे पत्रेही हवेत उडून गेले आहेत. मोरगाव आणि गणेशपूर येथेही घरांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

तत्काळ पंचनाम्यांची मागणी
सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी या सर्व नुकसानीची माहिती ठाणे जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख आणि कृषी अधिकारी संदीप केणे यांना तत्काळ कळवली आहे. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना लवकरात लवकर भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. तर तालुक्यात झालेल्या वादळामुळे विविध गावांत मालमत्तेचे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही. प्रशासकीय स्तरावर नुकसानीचा आढावा घेतला जात आहे, अशी माहिती मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT