भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यबाबत धक्कादायक खुलासे
नालासोपारा, ता. ३ (बातमीदार) : स्वतःला महादेवाचा अवतार सांगत महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वैद्यने पीडितेला अश्लील व्हिडिओ पाठवून मानसिक छळ करण्यासह पतीला आणि मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर वसई, विरार, नालासोपारा परिसरात या भोंदूबाबाविरोधात संतापाची लाट पसरली आहे.
वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य याच्यावर पुण्यातील एका पीडित महिलेने माणिकपूर पोलिस ठाण्यात बलात्कारचा गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा पुणे येथील हडपसर मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग झाला आहे. पुणे पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक करून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. मात्र, आता या भोंदूबाबाचे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या भोंदूबाबाची फेसबुकवरून पीडितेशी ओळख झाल्यानंतर त्याने तिला आपल्या जाळ्यात ओडून तिच्यावर अत्याचार केला. नंतर तिचे अश्लील व्हिडिओ, फोटो काढून ब्लॅकमेल करू लागला. हे सर्व व्हिडिओ तिला पाठवून मानसिक त्रास दिल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने पोलिसांकडे दिलेल्या पुराव्यांमध्ये मोबाईलवरील स्क्रीनशॉटचा समावेश आहे. याबाबत पीडितेच्या पतीने भोंदूबाबाला समज दिली. मात्र, वैद्य वारंवार महिलेला त्रास देत होता. एवढच नव्हे तर त्याने पीडितेचा पती व मुलाला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली होती. अखेर त्याच्या जाचाला कंटाळून पीडितेच्या पतीने थेट वसई पोलिस ठाणे गाठत २९ ऑक्टोबर २०२५ ला तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी प्राथमिक तक्रार दाखल करून घेत वैद्यविरोधात भा. द. वि. कलम ३५२, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला. पण दुसऱ्या दिवशी चक्क पीडितेच्या पतीविरोधातच मारहाण व शिवीगाळ प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर ही वैद्य पीडितेला वारंवार त्रास देत होता व अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने माणिकपूरमध्ये तक्रार दाखल केली व हे प्रकरण समोर आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.