मुंबई

वसई विरार मनपाची विक्रमी वसुली

CD

कर संकलनात विक्रमाला गवसणी
वसई-विरार पालिकेची चारशे कोटींची वसुली
विरार, ता. ३ (बातमीदार)ः वसई-विरार पालिकेने पालिकेने राबवलेल्या विविध सवलत योजना, नागरिकांच्या प्रतिसादामुळे यंदा ३९३.९४ कोटींची वसुली झाली आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच हा टप्पा गाठला आहे.
वसई-विरार महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ८६० कोटींचे करवसुलीचे उद्दिष्ट पालिकेच्या समोर होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत उद्दिष्ट वाढले होते. मात्र, त्यातुलनेत करवसुली थंडावली होती. याच अनुषंगाने एप्रिल, मेमध्ये मालमत्ता कर भरणाऱ्यांना करामध्ये सवलत जाहीर केली होती, तर आर्थिक वर्षाच्या शेवटी अभय योजना लागू केली होती. त्यामुळे अनेक थकबाकीदारांनी कर भरणा केला आहे. त्यामुळे ३१ मार्च अखेर ३९३ कोटी ९४ लाखांचा वसुलीचा टप्पा पालिकेने पार केला आहे. पालिकेच्या सवलत योजनांमुळे, देयके वितरणातील गती ऑनलाइन कर भरण्याचा पर्याय, ऑनलाइन देयके उपलब्ध करून दिल्यामुळे शक्य झाले आहे.
-----------------------------------
वर्ष आर्थिक वसुली
२०२२-२३ ३७२
२०२३-२४ ३४६
२०२४-२५ ३९३.८३
---------------------------------------
पालिका निवडणुकीचा अडसर
२०२४-२५ आर्थिक वर्षात मालमत्ता कराची वसुली लवकरात लवकर होण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले होते. यासाठी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मालमत्ताधारकांसाठी सवलत जाहीर केली, पण पालिका निवडणुकीमुळे करवसुलीच्या कामात अडथळा निर्माण झाला होता.
====================================
कारवाईचा धडाका
२०२५-२६ या वर्षात निवासी मालमत्ता, वाणिज्य मालमत्ता नव्याने शोधण्यात आल्या आहेत. तसेच पालिकेने थकबाकीदारांच्या अडीच हजार मालमत्ता जप्त केल्या आहेत, तर ३०० हून अधिक नळजोडण्या खंडित केल्या आहेत. त्यामुळे अनेक थकबाकीदारांनी कारवाईच्या भीतीने करभरणा केल्याचे पालिकेने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT