मुंबई

बालेकिल्ल्याच्या बांधकामाचे चिरे लंपास

CD

वसई किल्ल्याच्या अस्तित्वाला धक्का
चिरेबंदीचे दगड लंपास, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

विरार, ता. ३ (बातमीदार) ः केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अनास्थेमुळे वसई किल्ला नेहमीच चर्चेत राहिला आहे. अशातच वसई किल्ल्यातील मोठ्या बुरुजाच्या पायाचे चिरेबंदीसाठीचे दगड काढले आहेत. त्यामुळे भविष्यात वसई किल्ल्याची पडझड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वसई शहरातील ऐतिहासिक किल्ला बुरूज पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयापासून १५ सेकंदावर आहे. गेल्या दहा दिवसांपासून अज्ञात स्थानिक व्यक्ती बालेकिल्ल्याच्या पायाचे दगड सरळ एका रेषेत काढून नेत आहेत. काही महिन्यांपूर्वी बुरुजाच्या पायाकडील एक दगडी रेषा काढण्यात आली होती. आता दुसरीही चिरे रेषा काढून मोकळी करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे बुरुजाच्या पायाचेच दगड काढून टाकल्याने बुरुज कोसळण्याचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी हा प्रकार होत असल्याने पुरातत्त्व विभागाने चौकशी करणे आवश्यक आहे. तसेच किल्ल्यातील झाडीत बंदिस्त झालेल्या वास्तूंचे भविष्य काय, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
-----------------------------------
जनजागृतीच्या प्रयत्नांना अपयश
किल्ले वसई मोहीम परिवारअंतर्गत वसई किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक असणारी सर्वतोपरी जागृती नियमितपणे करण्यात येत आहे; परंतु स्थानिक नागरिकांचे अपेक्षित कोणतेही सहकार्य मिळत नसल्याची खंत कायम आहे. संबंधित विषयावर विविध आंदोलनात विनंती पत्रके देण्यात आलेली आहेत. पुरातत्त्व विभागाने दुर्गमित्र संघटनांना सोबत घेऊन किल्ला संवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
=========================================
किल्ल्यातील प्रमुख वास्तूंच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागअंतर्गत नेमके काय नियोजन सुरू आहे, याबद्दल काहीही खुलासा होत नाही. किल्ल्यात सुरू असणारी दगडचोरी किल्ल्याचे अस्तित्वच संपवून टाकेल.
- श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

हेमंत ढोमेच्या सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते... इंडस्ट्रीतल्या गटबाजीवर श्वेता शिंदेचं स्पष्ट मत, म्हणते- माझी मुलगी जर...

एक्सपायरी संपलेली बिस्किटं अन् कोल्डड्रिंक्सवर नवीन तारीख लावून विक्री, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

See-Wood Farming : ‘सी-वीड’ शेतीतून महिलांची झेप; समुद्रातून उभा राहतोय रोजगार

SCROLL FOR NEXT