बोगस रिक्षाचालक रडारवर
मिरा-भाईंदरमध्ये परवाने पुनर्तपासणीचे आदेश
भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहारात खोट्या कागदपत्रांच्या आधारे रिक्षा परवाने मिळवणाऱ्या रिक्षाचालकांची आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन विभागाकडे तक्रार केली आहे. अशा चालकांचे परवाने तसेच बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणीचा अहवाल १ मेपर्यंत सादर करण्याच्या सूचना परिवहनमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मिरा-भाईंदर शहरात बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने मिळवून मोठ्या प्रमाणात रिक्षा व्यवसाय सुरू आहे. एकाच क्रमांकाच्या शिधापत्रिका, विजेची देयके त्याचप्रमाणे जन्म दाखल्यांचा उपयोग करून रिक्षा परवाने मिळवण्यात आले आहेत. जवळपास २५ प्रकरणे पुराव्यासह असून, अशाच पद्धतीने शेकडो परवान्यांचे वाटप शहरात झाल्याची शक्यता मेहता यांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, कागदपत्रांमधील नावांमध्ये फेरबदल करून त्यांच्या प्रती काढून परवाने मिळवले जात आहेत. मात्र, अधिकारी परवाने देताना कागदपत्रांची तपासणी का करत नाहीत, असा सवाल मेहता यांनी उपस्थित केला आहे.
----------------------------
अधिकाऱ्यांना निर्देश
परिवहनमंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यातील सर्व परिवहन अधिकाऱ्यांची गुरुवारी (ता. २) बैठक झाली. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर, उपसचिव चेतन निकम उपस्थित होते. या वेळी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना गेल्या काही वर्षांत दिलेल्या परवान्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
-------------------------------
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातून या मोहिमेची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी महिनाभराचे विशेष शिबिर घेऊन प्रत्येक कागदपत्राची बारकाईने छाननी करण्यात येईल.
-प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.